Tata Nexon l भारतीय बाजारात ‘या’ कारची सर्वांना क्रेझ!

Tata Nexon l आजकाल तरुणांमध्ये चारचाकी वाहनांची क्रेझ आहे. त्यामुळे कार कंपन्या बाजारात नवनवीन वाहन कार लाँच करत असते. अशातच भारतीय बाजारपेठेत (Tata Nexon) टाटा नेक्सॉनचा दबदबा कायम असल्याचे दिसून येत आहे. आता टाटा नेक्सॉनच्या निर्मिती संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे.

टाटा मोटर्सने नेक्सॉनच्या 6 लाख युनिटची निर्मिती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने 2017 मध्ये ही सब-फोर मीटर SUV लाँच केली होती, त्यानंतर ती भारतीय ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये (Tata Nexon) या मॉडेलने 5 लाख युनिट्सचा उत्पादनाचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

टाटा नेक्सॉन पॉवरट्रेन (Tata Nexon) :

टाटा नेक्सॉनच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर ते 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे 118bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते, तर इतर इंजिनमध्ये 1.5-लिटर डिझेल आहे, जे 113bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. टॉर्क ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड एएमटी आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स समाविष्ट आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने नेक्सॉनची फेसलिफ्ट आवृत्ती (Tata Nexon) लाँच केली होती. ज्यामध्ये तिला नवीन रूप आणि नवीन डिझाइन मिळाले. याशिवाय अनेक फीचर्सही जोडण्यात आले आहेत. त्याच्या सेगमेंटमध्ये, Nexon SUV मारुती सुझुकी ब्रेझा, Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV300, Nissan Magnite आणि Renault Kiger यांसारख्या कारशी स्पर्धा करते.

Tata Nexon l टाटा नेक्सॉन वैशिष्ट्ये :

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Nexon SUV, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, उंची ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक एसी, क्रूझ कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, पॅडल शिफ्टर, 9 स्पीकर साउंड. 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक (Tata Nexon) स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासह अनेक वैशिष्ट्यांनी ही प्रणाली सुसज्ज आहे.

Tata Nexon l टाटा नेक्सॉनची किंमत काय असणार? :

टाटा नेक्सॉन सध्या देशात ICE आणि EV रेंजसह उपलब्ध आहे. ICE रेंजची किंमत 8.10 लाख रुपये होते. तर EV रेंजची किंमत 14.74 लाख रुपयांपासून सुरु होते. (Tata Nexon Records 6 Lakh Production Milestone Car)

News Title : Tata Nexon Records 6 Lakh Production Milestone Car

महत्वाच्या बातम्या –

Bhiksha Mukt Bharat l मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत 2026 नंतर देशात एकही भिकारी दिसणार नाही; जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन

MLA Anil Babar Death l मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीला अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल

Sleeping Habits l कमी झोपण्याच्या सवयींमुळे या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

New Currency Notes l मोठी बातमी! पुन्हा लागणार बँकांबाहेर रांगा? बघा कुठे झाली नोटबंदी