Top news तंत्रज्ञान देश

इलेक्ट्रिक कारमध्ये टाटांची बाजी; नेक्सॉननं रचला ‘हा’ सर्वात मोठा कारनामा!

नवी दिल्ली | गेल्या एक वर्षांपासून सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. तेव्हापासून इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, भारतात सर्वात जास्त कोणती इलेक्ट्रिक गाडी विकली जाते ?

सध्या भारतीय बाजारपेठेत टाटाची एसयूव्ही नेक्सॉन गाडी सर्वात सुरक्षित मानली जात आहे. टाटा मोटर्सने सर्वात सुरक्षित एसयूव्ही नेक्सॉन गाडी या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली होती. टाटा एसयूव्ही नेक्सॉन विक्रीच्या बाबतीतही सर्वात पुढे आहे.

आता सप्टेंबर महिन्यात ३०३ टाटा नेक्सॉन गाड्यांची विक्री झाली. कोणत्याही इलेक्ट्रिक गाडीची एका महिन्यातील ही सर्वात जास्त विक्री आहे. भारतीय बाजारात जवळपास ६१ टक्के हिस्सा टाटा नेक्सॉनचा आहे. इलेक्ट्रिक एमजी मोटर्सने सप्टेंबर महिन्यात १२७ गाड्यांची विक्री केली.

ऑगस्टमध्ये ८५ गाड्यांची विक्री केली. सध्या एमजी मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्या कोलकाता, लखनऊ, लुधियाना, कोयमटूर, डेहराडून, नागपूर, आग्रा, औरंगाबाद, इंदोर आणि विशाखापट्टणम सहित देशात २१ शहरात उपलब्ध आहे.

सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील विविध कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे. पण टाटा नेक्सॉन या क्षेत्रात सर्वात पुढे आहे. भारतीय बाजारात टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची शोरूम किंमत १३.९९ लाख ते १५.९९ लाखांच्या मध्ये आहे.

टाटा नेक्सॉन गाडी तीन व्हॅरीअंटमध्ये उपलब्ध आहे. टाटा नेक्सॉन गाडी एकदा चार्ज केल्यावर ३१२ किलोमीटर धावू शकते. गाडीवर ८ वर्षांची स्टॅण्डर्ड वॉरंटी आणि IP67 वॉटरप्रूफ बॅटरीचाही समावेश आहे. फास्ट चार्जरने गाडीची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत ६० मिनिटात चार्ज होते.

टाटा नेक्सॉन गाडीसाठी कंपनीने नवीन ZConnect हे अ‌ॅप्लिकेशन दिलेलं आहे. या मोबाईल अ‌ॅप्लिकेशनमध्ये ३५ अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहे. त्यातच एमजी इलेक्ट्रिक गाडीची शोरूम किंमत २०.८८ लाख ते २३.५८ लाखांमध्ये आहे. ही गाडी दोन व्हॅरीअंटमध्ये उपलब्ध आहे.

एकदा चार्ज केल्यावर ही गाडी ३४० किलोमीटर धावू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. ७.४ किलो वॅट चार्जरने चार्ज केल तर ६-८ तासात ० ते १०० टक्के चार्जिंग केली जाऊ शकते. तेच जर ५० किलो वॅट चार्जरने केली तर ५० मिनिटांपेक्षा कमी वेळात चार्जिंग होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नाला 58 वर्षे झाल्यानंतर केले लग्नाचे फोटोशूट, कारण वाचून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू!

आर्थिक तंगीत 9 लाखाच्या हिऱ्यांची बॅग सापडली, कामगारानं जे केलं ते वाचून हैराण व्हाल!

मुकेश खन्ना यांनी अखेर ‘ते’ मोठं रहस्य उलगडलं; कपिल शर्माच्या शोमध्ये…

साऊथचे 7 जबरदस्त हिट हिंदी सिनेमे; हे पाहिले नाहीत तर काय पाहिलं?

रियानं सुशांतला आ त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं होतं? सीबीआयचा मोठा खुलासा