टाटाची Gravitas लॉंचिंगसाठी सज्ज, 26 जानेवारीला होणार लॉंच

नवी दिल्ली | अलीकडे वाहन उ.द्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये वाहन कंपन्यांच्या वि.क्रीत चांगलीच वाढ झाली आहे. कोरोना महामा.रीचा प्रा.दुर्भाव कमी झाल्यानंतर जग आता पुर्वावस्थेत येऊ लागल्यानं अनेक वाहन कंपन्या आपल्या नवीन गाड्या बाजारात उतरवू लागल्या आहेत.

अशातच आता टाटा मोटर्सची आणखी एक हटके कार बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा मोटर्स आपली 7 सीटर एसयुव्ही Gravitas ही गाडी बाजारात उतरवणार आहे. 26 जानेवारीला ही Gravitas लॉंच करण्यात येणार आहे.

Gravitas गाडी टाटाच्या हॅरियरप्रमाणेच बनवण्यात आली आहे. परंतु हॅरियरपेक्षा जास्त सीट्स Gravitas मध्ये देण्यात आले आहेत. 7 सीटर एसयूव्ही Gravitasची घोषणा करतानाच कंपनीने सांगितलं होतं की, या गाडीचं नाव जरी वेगळं असलं तरी ही गाडी टाटाच्या हॅरियरप्रमाणेच बनवण्यात येणार आहे.

Gravitas आणि हॅरियरमध्ये थोडे फारच बदल करण्यात आले आहेत. दोन्हीही गाड्या एसयूव्ही ओ.मेगा प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आल्या आहेत. पण हॅरियर 5 सीटर आहे तर Gravitas ही 7 सीटर आहे.

टाटाच्या Gravitasची एकूण लांबी 4661mm इतकी तर रुंदी 1894mm  इतकी आहे. गाडीची उंची 1741mm इतकी आहे. या गाडीचा व्हीलबेस 2741mm  एवढा आहे.  हॅरियरपेक्षा या गाडीची लांबी रुंदी जास्त आहे कारण या गाडीमध्ये सीट्सची थर्ड रो जास्त बसवण्यात आली आहे.

या दोन्ही गाड्यांच्या लांबी रुंदीमध्ये फरक असला तरी या गाड्यांच्या लूकमध्ये जास्त फरक नाही. या दोन्ही गाड्या लूकला एकसारख्याच वाटतात. Gravitas मध्ये कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. एक स्टे.प्ड छत ग्रेविटासला हॅरियरपेक्षा वेगळी कार सिद्ध करतं.

Gravitas ची किंमत 13 लाख ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, या गाडीची नेमकी किंमत लॉंचिंगवेळीच समोर येईल. Gravitas लॉंच झाल्यानतर या गाडीची टक्कर एमजी हे.क्टर प्लस या कारसोबत होईल, असं बोललं जात आहे. एमजी हे.क्टर प्लस ही कार 6 सीटर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-