…अन् पठ्ठ्यानं लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडच टॅटू म्हणून काढला, पाहा व्हिडीओ!

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना नियमही हळूहळू शिथिल होत आहेत. मात्र कोरोना संकट पूर्णपणे कमी करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण करणं हे नागरिकांसाठी गरजेचं झालं आहे. अशातच सोशल मीडियावर लसीकरणाविषयी अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असलेले पाहायला मिळतात.

कोरोना काळात लसीकरण गरजेचं असल्यानं अनेक ठिकाणी लस घेणाऱ्यांना निर्बंधांमध्ये सूट दिलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे लसीकरण केलेलं प्रमाणपत्र दाखवणं अनिवार्य बनून गेलं आहे. प्रमाणपत्र सारखं सोबत वागवावं लागतं म्हणून लोक काही भन्नाट कल्पना करत प्रमाणपत्र सोबत ठेवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सारखं सारखं प्रमाणपत्र वागवावं लागू नये म्हणून पठ्ठ्यानं चक्क लसीकरण प्रमाणपत्रावरचा क्यूआर कोडच टॅटू म्हणून काढून घेतला आहे. ज्यामुळे स्कॅन केल्यावर लसीकरण प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे तरुणाच्या या भन्नाट जुगाडला सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

टॅटू आर्टिस्ट गॅब्रिएल पेलेरोननं हा व्हिडीओ सोशल मीडियावर केला आहे. हा क्यूआर कोड कसा काम करतो हेही व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. अनेकांनी काहीतरी वेगळी आयडीया म्हणत या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षावर केलेला पाहायला मिळत आहे. अनेकांनी भन्नाट कमेंट्स करत व्हिडीओला पसंती दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर लसीकरण झाल्यावर फोटो शेअर करण्याचं आणि सर्टिफिकेटचा फोटो टाकण्याचा एक क्रेझच झाला आहे. त्यामुळे सोशल मीडिया उघडल्यावर तुम्हाला या स्टोरीज तुम्हाला हमखास पाहायला मिळतील.

कोरोना लसीविषयी लोकांच्या मनात भीती असल्यानं लोक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. मात्र आता हळूहळू लोक पुढे येत स्वतः लसीकरण करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता लसीकरणामुळे दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. 

https://www.instagram.com/reel/CS1djE3gQ8R/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CS473oegMLw/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

मुलगा हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का? – जॅकी श्रॉफ

ती वॉश बेसिनमध्ये पाय धुवायला गेली अन् बदकन आदळली; पाहा व्हिडीओ

झूम मिटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा सुरू झाला अन् शिक्षकाचं बेडवरील कृत्य सर्वांसमोर आलं

वरुण धवन ठाकरे सरकारवर संतापला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मी खूपच रोमॅन्टिक आहे, मला 3-4 मुलांची तरी आई व्हायचंय – भूमी पेडणेकर