मुंबई : कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुन्हा निवड करण्यात आली आहे. याआधी 2017 मध्ये रवी शास्त्री यांची निवड झाली होती. दरम्यान वर्ल्ड कपमधील पराभवानंतरही रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे.
कपिल देव यांनी सकाळी मुलाखती घेण्यास सुरुवात केली. या समितीमध्ये माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. तर या पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांच्यात होती.
मुलाखतीच्या आधीच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी या शर्यतीतून माघार घेतली. त्याचबरोबर आज टीम इंडियातील इतर स्टाफच्या नावांचीही आज घोषणा करण्यात आली.
प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं.
जुलै 2017 मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला.
दरम्यान, रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्डकप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कर, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-“महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट तरीही मुंबई दर पावसाळ्यात तुंबते”
-सैफने केलं स्मिता तांबेच्या अभिनयाचं कौतुक; म्हणाला…
-भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी ही नावं चर्चेत; कोणाची लागणार वर्णी???
-इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ पुरस्कारानं सन्मान
-मी बिकाऊ नाही; भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं पंतप्रधानांना ट्वीट