खेळ

भारतीय संघात विराट आणि रोहित यांचे दोन गट???

मुंबई : टीम इंडिया कर्णधार विराट कोहली आणि आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एकतर्फी कारभारामुळे भारतीय संघात असंतोष परसल्याचं समोर आलं आहे. 

रवी शास्त्री आणि विराट कोहली कोणालाही न विचारता परस्पर निर्णय घेतात. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्मा यांचे दोन गट पडले असल्याचं सामोर आलं आहे.  

‘बीबीसीआय’च्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद रॉय यांचा भारतीय कर्णधाराला पाठिंबा आहे. म्हणून शास्त्री आणि विराट यांच्या कारभाराला कोणी विरोध करु शकत नसल्याचं सांगण्यात येत आहे.  

रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह यांचा अपवाद वगळता विराट कोहलीच्या गटातील खेळाडूंनाच भारतीय संघात स्थान दिलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. 

अंबाती रायडूऐवजी विजय शंकरला देण्यात आलेली संधी हे त्यांच्या पराक्रमाचे एक उदाहरण आहे, असं वृत्त ‘दैनिक जागरण‘ या वृत्तपत्राने दिलं आहे.

दरम्यान, भारतीय संघामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडले असले तरीही संघात फूट पडावी इतका वाद टोकाला पोहचला नाही.

IMPIMP