खेळ

… म्हणून भारतीय संघ इंग्लंडमध्येच राहणार

लंडन : विश्वचषकात प्रवास संपलेला भारतीय संघ परतीच्या प्रवासाला निघाला होता मात्र भारतीय संघासमोर एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. 

सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला. सामन्यानंतर भारतीय संघ मायदेशी निघाला पण त्यांचे भारतात परतण्यासाठीचे तिकीट बुक न झाल्याने आता त्यांना वर्ल्डकपच्या शेवटच्या सामन्यापर्यंत इंग्लंडमध्ये राहावं लागणार आहे. 

भारतीय संघाला इंग्लंडमध्ये जबरदस्तीने राहावं लागणार असल्याने वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या व्यवस्थापकाची डोकेदुखी वाढली आहे. 

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड हा अंतिम सामना रविवारी पार पडणार आहे. भारतीय संघाला हा सामना संपेपर्यंत इंग्लंडमध्येच राहावं लागणार आहे. 

सेमीफायनलमध्ये बीसीसीआयने खेळाडूंचे परतीचे तिकीट ऐनवेळी बुक केले. त्यामुळे हा सर्व गोंधळ पाहायला मिळाला.

IMPIMP