…म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

मुंबई | झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरचा किचन कल्लाकार (Kichan kallakar) हा कार्यक्रम सर्वांना आवडतो. हा कार्यक्रम आता घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमात अनेक प्रमुख पाहुण्यांना बोलवलं जातं.

किचन कल्लाकार या शोचे महाराज म्हणजेच प्रशांत दामले (Prashant Damle) पाहुण्यांसोबत गप्पा मारताना दिसतात अनेक गोष्टींवर या कार्यक्रमात चर्चा होत असते. या शोचा पुढील प्रोमो सध्या रिलीज करण्यात आला आहे.

किचन कल्लाकार या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बोलवण्यात आलं होतं.

या तिन्ही पाहुण्यांशी बोलताना प्रशांत दामले यांनी तिन्ही नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावेळी प्रशांत दामले यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर पंकजा मुंडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

आज जर साहेब म्हणजे गोपिनाथ मुंडे साहेब इथं असते तर ते तुम्हाला काय म्हणाले असते. त्यांच्या बद्दल काय भावना आहेत?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला. हा प्रश्न ऐकून पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी आलं.

ते प्रचंड निराश झाले असते. कारण जेव्हा मी परफॉर्म करायचे किंवा भाषण करायचे तर ते एक नेता म्हणून नाही तर एक पिता म्हणून फार निराश व्हायचे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

ते माझी खूप काळजी करायचे. मी ज्यावेळी परळी क्राॅस करायचे तेव्हा माझ्या मागे दोन गाड्या यायच्या. त्यावेळी पाठलाग करणाऱ्यांना विचारलं तर ते म्हणायचे की आम्हाला साहेबांचा फोन आला होता, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

दरम्यान, ते माझी काळजी घेत असत. ते आज असते तर माझा पदार्थ जिंकावा, असं त्यांना वाटलं असतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ- 

महत्वाच्या बातम्या –

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”

ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!

कोरोनाबाधित असूनही सुप्रिया सुळेंनी घेतली निलेश लंकेंची भेट?; भाजपकडून टीकेची झोड