बहुप्रतिक्षित OnePlus 10 Pro लवकर बाजारात धडकणार; किंमत पण खूपच कमी

मुंबई | मागील काही वर्षापासून भारतात OnePlus मोबाईलची क्रेझ वाढताना दिसत आहे. अनेक तरूणांना OnePlus ने वेड लावल्याचं दिसतंय. अशातच आता OnePlus ने आज मोठी घोषणा केली आहे.

OnePlus ने ट्विट करत याबाबत संकेत दिले आहेत. कंपनीनं ट्विटरवर या फोनचं प्रमोशन सुरू केलं आहे. फोनमध्ये येणाऱ्या प्रमुख फिचर्सवर यावेळी माहिती देण्यात आली आहे.

वनप्लस कंपनीनं चीनमध्ये OnePlus 10 pro आणि OnePlus 10 हे स्मार्टफोन लाँच केले होते. भारतात OnePlus 10 pro चं लॉंचिंग काही दिवसांत होईल, अशी माहिती देखील कंपनीने दिली आहे.

या फोनच्या रिलीजची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरूवातीला फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या प्रोमोमध्ये नवा वन प्लस आधुनिक कॅमेऱ्यासह लाँच होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. वन प्लस प्रामुख्याने कॅमेऱ्यासाठी भारतात प्रसिद्ध आहे.

दरम्यान, OnePlus 9 Pro हा फोन 64,999 लाँच केला होता. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं देखील पहायला मिळालं होतं. त्यानंतर आता OnePlus 10 pro ची किंमत सुमारे 60,000 रुपये असण्याची शक्यता आहे. आधीच्या फोनच्या तुलनेत नवीन 10 pro ची किंमत असण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच” 

“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”