Marathi News | अनेक चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका विशेष गाजत असताना या मालिकेतून तेजश्रीने अचानक एक्झिट घेतल्याने सर्वांना धक्का बसला होता. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तेजश्रीने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे तिच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटले होते.
तेजश्री मालिकेचा मुख्य चेहरा होती, त्यामुळे तिने मालिका सोडताच या मालिकेचा टीआरपी देखील घसरला. मात्र, आता मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्यानंतर जेवढा धक्का चाहत्यांना बसला होता त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य तेजश्रीने नुकतीच केलेली पोस्ट पाहून वाटले आहे.
तेजश्री प्रधानची नवी पोस्ट चर्चेत-
प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) पाठोपाठ आता तेजश्रीनेही (Tejashri Pradhan) आश्रमाची वाट धरल्याचे दिसत आहे. मालिका सोडल्यानंतर तेजश्री थेट बंगळुरू आश्रमात पोहोचली आहे. तिची नवी पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तेजश्री प्रधान श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात वास्तव्यास आहे.
याच आश्रमातील जेवणाच्या ताटाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जेवणाच्या ताटात वरण-भात पापड, भाजी असे काही पदार्थ पाहायला मिळत आहेत. मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान ‘आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर’ आश्रमात बंगळुरूला पोहोचली आहे.
तेजश्रीही सुद्धा आश्रमात-
गेल्या काही आठवड्यांपूर्वी प्राजक्ता माळीनेही बंगळुरू आश्रमाला भेट दिली होती. तसेच प्राजक्तानंतर आता तेजश्रीही (Tejashri Pradhan) याच आश्रमात पोहोचली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ती आश्रमात बंगळुरूला पोहोचली असल्याचे सांगितले. तेजश्रीने आश्रमातील जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच तेजश्रीने एका वासराबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री वासराला प्रेमाने गोंजारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तेजश्रीने लिहिले की, “आम्ही एकमेकांसारखे चेहरे केलेत की नाही…आणि यांच्या डोळ्यांचं काय करायचं…किती तो निरागसपणा” असे कॅप्शनही तिने दिले आहे.
‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये…’, माधूरी दिक्षीतच्या खुलाशाने बाॅलिवूडकरांची उडाली झोप!-
बीड पॅर्टन आता पुण्यात सुद्धा, खंडणीसाठी पुण्यातील ‘या’ भागात भरदिवसा गोळीबार-
तेजश्रीच्या मालिका सोडण्याबाबत चर्चा-
दरम्यान, अभिनेत्री तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरमुळे मालिका सोडल्याची चर्चा आहे. दोघींनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळे दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याचेही सांगण्यात येत आहे. यावर अद्याप अधिकृतरीत्या मात्र कोणाकडूनही काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, तेजश्रीचे अचानक आश्रमातील फोटो पाहून चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटले आहे.