Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा”

Supriya Sule

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांच्या घरात घुसून चप्पल फेक केली. त्यानंतर हा विषय आता राज्यभर चर्चेत आहे.

शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणावर निषेध नोंदवला आहे.

अशातच आता या घटनेवर खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

त्यांच्या या वक्तव्यानंतर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप केले जात आहे. त्यावर आता त्यांनी स्वत: माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी कोण गेलं, आंदोलन केलं याची माहिती नाही. सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

कष्ठकरी हे कधीही कुणावर हल्ला करत नाहीत. हल्ला केला असं शरद पवारांनीही कुठेही म्हटलं नाही, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

मलाही कुठंही तसं कोणी हल्ला केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे या कष्टकऱ्यांना बदनाम करू नका, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

26/11 चा म्होरक्या हाफिज सईदला न्यायालयाचा दणका; मोठी शिक्षा सुनावली

‘सिल्वर ओक’वरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”

शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’वर आंदोलन करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा थेट इशारा!

‘सिल्वर ओक’वर राडा! सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात…”