मनोरंजन

पहिला हक्क इथल्या मराठी लोकांचा; पाहा ‘ठाकरे’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातलं अटल व्यक्तिमत्व आहे. त्यांच्य़ा भाषण शैलीमुळे आणि स्वभावामुळे ते कायमच चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व होतं. याच व्यक्तीमत्त्वार आधारित बहुप्रतिक्षित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर अभिजीत पानसे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केली आहे. अतिशय ताकदीने त्यांनी ही भूमिका पेलली आहे. तत्कालीन राजकारण, 1992 ची मुंबई दंगल, बाबरी मशीद प्रकरण आणि त्याबाबतीत बाळासाहेबांची भूमिका या साऱ्यांचा उलगडा या चित्रपटात  होणार आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आज ‘ठाकरे’ सिनेमाच्या हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतील ट्रेलरलचं लाॅंचिंग करण्यात आलं आहे.

पाहा ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर-

IMPIMP