मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार- निलेश राणे

मुंबई | भाजपने पुकारलेल्या माझं अंगण, माझं रणांगण, महाराष्ट्र वाचवा या आंदोलनात आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी नितेश आणि निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, हे घरी बसून फक्त फेसबुक लाईव्ह करु शकतात, असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केलाय.

शिवसेना हॅशटॅग आंदोलन करु शकते. कारण ते बोटे दाबण्यात पटाईत. लोक शिव्या घालत आहेत. हॅशटॅग करुन लोकांची मने जिंकता येत नाहीत, असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, हे ट्विटर वॉर थांबवायचे की नाही त्यांचा विषय. मी साखरेबद्दल बोललो, मी पवार साहेबांचे नाव देखील घेतले नाही. ते आदरणीय आहेत आणि राहतील, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘…ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा’; अमोल मिटकरींचा भाजपला टोला

-गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

-मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा

-कोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश

-मुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका