शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कर्जमाफीचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कर्जावरील व्याज सरकार भरणार

मुंबई | महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी गोड बातमी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र सरकारी प्रक्रियांमुळे ते पैसे मिळायला उशीर होत असल्याने पैसे मिळेपर्यंतचे कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे, असा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

ठाकरे सरकारच्या निर्णयाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याने मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठाकरे सरकारचा हा स्तुत्य निर्णय म्हटला जातोय.

सरकारने यासंबंधीचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकांना आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना दिले आहे. कर्जखात्याला आधार नोंदणी आवश्यक असणार आहे

दुसरीकडे सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपला टोमणा मारला आहे. ‘संवेदनशिल सरकार संवेदनशिल निर्णय’ असं ट्वीट करत सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य 

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

-सासरवाडीऐवजी कर्जत-जामखेड का निवडलंत?; रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर