भाजपने नेमलेले 19 साखर कारखान्यांवरचे संचालक हटवले; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई |  सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने फडणवीसांना आणि भाजपला एकापाठोपाठ एक धक्के द्यायचं ठरवलेलं दिसतंय. तत्कालिन फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय रद्द करणं असो वा त्यावर विचार करणं असो…. ठाकरे सरकारचं भाजपला धक्कातंत्र सुरूच आहे. असाच निर्णय आज ठाकरे सरकारने घेतला आहे. 19 साखर कारखान्यांवरचे भाजपने नेमलेले संचालक आज ठाकरे सरकारने हटवले आहेत.

बारामती, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, हिंगोली यांसारख्या जिल्ह्यातील साखर कारखान्यावर भाजपने आपल्या कार्यकाळात मर्जीतले संचालक नेमले होते. त्यामुळे सहकार क्षेत्र भाजपमुक्त करण्याचा इरादा ठाकरे सरकारचा आहे की काय? अशी चर्चा आता या निर्णयानंतर रंगू लागली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारचे मेट्रो कारशेड, सरपंचाची जनतेतून थेट नियुक्ती, उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करणं यासारखे  निर्णय उद्धव ठाकरे यांनी रद्द केले आहेत. आणि आज 19 साखर कारखान्यांवरचे भाजपने नेमलेले संचालक रद्द करून सरकारने फडणवीसांना मोठा दणका दिला आहे.

दुसरीकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे सहकारासाठी पॉवरफुल्ल म्हणून ओखळले जातात. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे अनेक नेते सहकार क्षेत्राला मदत करतो म्हणून पक्षात घेतले होते. मात्र आता नव्या राजकीय समीकरणाने सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपचे नेतेच गोळी मारा म्हणत असतील तर हे होणारच; प्रियांका गांधींचं टीकास्त्र

-जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्या मुखातून शरद पवार तर बोलत नाहीत ना??- आशिष शेलार

-…..हा मार्ग देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे; जामिया गोळीबारावर थोरात यांचं मत

-एका नगरसेवकाने घेतली दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी; कोल्हापूर महापालिकेतला प्रकार

-तुकाराम मुंढेंची धडाक्यात कामाला सुरूवात; दिला 4 कर्मचाऱ्यांना दिला