हिंदीपेक्षा भन्नाट आहे ठाकरे सिनेमाचा मराठी ट्रेलर, पाहा इथंच…

मुंबई : ठाकरे सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

खासदार संजय राऊत यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

ठाकरे सिनेमात बाळासाहेबांनी भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने केली आहे. बाळासाहेबांना तोच रुबाब दाखवण्यात नवाजुद्दीन यशस्वी ठरल्याचं दिसत आहे. 

हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असला तरी मराठी माणसांना मराठी ट्रेलर अधिक भावत असल्याचं चित्र आहे. खालील व्हीडिओवर क्लीक करुन मराठी ट्रेलर पाहता येऊ शकतो.