ठाकरे सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळातील 20 महत्वपूर्ण निर्णय; वाचा यादी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. हे नवं सरकार जास्त दिवस टिकणार नाही, अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र, सध्या तरी ठाकरे सरकारने आपले 100 दिवस यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार आज विधीमंडळात मांडणार आहेत. त्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय असेल याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्राला हे समीकरण नवीन आहे. तसेच हे तीन चाकी सरकार असल्याने याचा भरोसा नाही, अशी टीका झाली. मात्र, आत्तापर्यंत सरकारने सुरळीतपणे काम केलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारवर स्थगिती सरकार म्हणूनही टीका झाली. कारण तत्कालीन फडणवीस सरकारच्या अनेक योजना नव्या सरकारने बंद केल्या आहे. शिवाय शंभर दिवसांच्या काळात सरकाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

महाविकास आघाडी सरकारचे 20 महत्वाचे निर्णय-

1. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 10 हजार कोटी देण्यास मान्यता
2. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी गरजूंना दहा रुपयात शिवभोजन योजनेस प्रारंभ
3. ‘मुंबई 24 तास’ संकल्पनेची घोषणा आणि अंमलबजावणी
4. राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू
5. नगर परिषद क्षेत्राचा विकास करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती
अवलंब
6. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार
7. सरकारशी संबंधीत आर्थिक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक अनिवार्य
8. रेडिरेकनरच्या दरात व्यावहारिकता आणून महसूल वाढ करणार
9. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन कॅबिनेट मंत्री समन्वय ठेवणार
10. एसटी महामंडळाच्या दोन हजार नवीन बसेससाठी 600 कोटींचा प्रस्ताव
11. सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण
12. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या योजनांच्या तांत्रिक तपासणीसाठी ऑटो डीसीआर प्रणाली
13. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग यापुढे ‘बहुजन कल्याण विभाग’ म्हणून ओळखला जाणार
14. दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवणार
15. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी ‘दिशा’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्याची घोषणा
16. मराठवाडा विभागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 1300 कोटींचा निधी, शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ची संकल्पना राबवणार
17. दृष्टीदोष असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार
18. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या 4 हजार 500 पदांची भरती करणार
19. मराठीतील वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यात ‘मिनी चित्रपटगृह’ उभारणार
20. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ 1 मेपर्यंत कार्यान्वित करणार

महत्वाच्या बातम्या-

-कोरेनाचे थैमान! भारतातील करोनाबाधितांची संख्या पोहचली 30 वर

-जनाची नाही किमान मनाची तरी…; मनसेची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

-“ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकार सकारात्मक”

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही- अण्णा हजारे

-कोकणचं नैसर्गिक वैभव जगासमोर आणणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही