पहिल्याच कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा भाजप आमदाराला दणका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे भाजपला मोठे दणके बसण्यासही सुरुवात झाल्याचं दिसतंय. कारण भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

महामंडळावरील जुने अध्यक्ष हटवून त्याजागी नवे अध्यक्ष आणण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रशांत ठाकूर यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाली आहे. विशेष म्हणजे ठाकूर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात.

‘सिडको’च्या अध्यक्षपदावर आता नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळात वर्णी न लागलेल्या एखाद्या नाराज आमदाराला सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत ठाकूर यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र महाविकास आघाडीनं भाजपला धक्के देण्यास सुरु केले आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने ही नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-