‘ठाकरे’ सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका!

मुंबई |  पालिका क्षेत्रात फडणवीस सरकारच्या काळात कामांना स्थगिती देण्यात आली आहे. ज्या कामांचा शुभारंभ झाला नसेल अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच दणका मिळाल्याचं बोललं जात आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना विकास कामांकरिता विविध योजनेंतर्गत विशेष अनुदान देण्यात येतं. यामध्ये महापालिका पायाभूत सुविधा, महापालिका हद्दवाढ, नवीन नगरपालिका, नगरपालिका हद्दवाढ, नगरपरिषद यात्रास्थळ आणि इतर योजनेतंर्गत 2019-20 आर्थिक वर्षात निधी वितरीत करण्यात आला आहे.

शासनाने वितरीत केलेल्या निधीपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत अशी सर्व कामे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी असा निर्णय नगरविकास खात्याने जाहीर केला आहे.

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोमानेच कामाला लागले आहेत. नुकतंच ठाकरे सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून एक दणका दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-