Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

kirit uddhav e1605847916274

मुंबई | गेल्या दीड वर्षापासून सर्वजण कोरोना या महामारीशी लढत आहेत. कोरोनाच्या भयानक प्रसाराचे परिणाम सध्या सर्वांना भोगावे लागत आहेत.

कोरोनानं देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठे दिर्घकालिन परिणाम केले आहेत. कोरोनानं खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था अनुभवायला मिळाली होती.

राज्य सरकारनं कोरोना महामारीमध्ये राज्यातील जनतेला दवाखान्यांची कमतरता भासू नये म्हणून राज्यभर मोठ्या प्रमाणात तात्पुरते कोविड सेंटर उभारले होते.

या कोविड सेंटरच्या माध्यमातून लाखो रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. अशात आता ठाकरे सरकारच्या याच कोविड केअर सेंटरवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

येत्या आठवड्याभरात ठाकरे सरकारचा कोविड केअर सेंटरचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

सत्ताधारी नेते आणि अधिकारी मिळून नागरिकांना घाबरवण्याचं काम करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढलेली असताना मुंबईतील कोविड केअर सेंटर रिकामे असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

कोविड सेंटर हे पैसा कमावण्याचं मोठं माध्यम झालं आहे. परिणामी सरकारकडून हे चालू करण्यात आल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत.

येत्या आठवडाभरात सर्व कागदपत्रांसह ठाकरे सरकारचा घोटाळा बाहेर काढणार आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून चिंता पसरवण्याचं काम सुरू आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी याअगोदरही राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट कोविड सेंटरबाबत खुलासा करण्याची घोषणा केल्यानं राज्यातील राजकारण पेटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रश्मिकाचं नाव, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी