ठाणे | ठाणे शहरातील आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवरून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची महापालिकेत महत्त्वाची बैठक बोलावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी वरचा सूर लावत लोकांच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार काम व्हायला हवं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
या बैठकीला एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, भाजपचे प्रमुख पदाधिकारी तसंच राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत लोकांनी अनेक तक्रारी केल्या. मग मात्र शिंदेचा पार चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
कागदी घोडे नाचवायचे बंद करून रूग्णांना उचार कसे मिळतील, हे पाहायला हवं. रूग्णवाहिका लवकरात लवकर कशी उपलब्ध होईल, याकडे ध्यान द्यायला हवं. अॅम्बुलन्सचे जे दर निश्चित केले आहेत त्यानुसारच ते घेण्यात यावेत तसंच खासगी हॉटेल आणि रूग्णांलयांमधली लूट बंद करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.
दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन चांगल्या आणि सक्षम अधिकाऱ्यांची फैज ठाण्यात आणावी, अशी मागणी केली. यावर शिंदेंनी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
महत्वाच्या बातम्या-
-“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”
-शेतकऱ्यांना आधार द्या; आंतरराष्ट्रीय रेटिंग आपोआप सुधारेल – राहुल गांधी
-कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने लिहिलं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; पत्रात म्हणतो…
-…तर लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही; वाचा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या सूचना
-लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही- अलाहाबाद उच्च न्यायालय