50 वर्षात पहिल्यांदा मी त्यांना चिडलेलं पाहिलं; पवारांच्या संतापनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

नवी मुंबई : श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत नातेवाईकांशी संबंधित एका प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिडल्यामुळं राज्यभरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. खुद्द पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय.

50 वर्षांत मी त्यांना कधी असं चिडलेलं पाहिलं नाही, असं सुप्रिया सुळे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. पक्षातील नेत्यांबरोबर तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत, असा प्रश्न शुक्रवारी पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते संतापले आणि पत्रकार परिषदेतून उठले. त्यांचा हा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल होत आहे.

त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुप्रिया सुळे या देखील वडिलांच्या वागण्यानं चकित झाल्या आहेत. तशी कबुलीच त्यांनी दिलीय.

कधीही न चिडणारा माणूस काल पहिल्यांदाच चिडलेला दिसला. मलाही आश्चर्य वाटलं. 50 ते 52 वर्षांत मी त्यांना कधी असं पाहिलेलं नाही. पण वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला एकच प्रश्न पाचवेळा विचारल्यावर चीडचीड होऊ शकतो. शेवटी माणूस आहे. खरंतर आपल्या पिढीनं याबाबत आत्मचिंतन करायला हवं, असं सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-