आता हेच पाहायचं राहिलं होत; चक्क गाई खेळतीय फुटबॉल, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ विनोदी, तर कधी-कधी अतिशय सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

तसेच काही व्हिडीओ प्राण्यांचेही व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचवेळा हाणामारी करतानाचे व्हिडीओ असतात. परंतू सध्या सोशल मीडियावर एक अनोखाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या माहित असेलच की, फुटबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे. अनेकजण आपल्या हातातील कामं सोडून ही मॅच पाहायला पळतात. या खेळामध्ये खूप सर्तक राहायला लागते. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे कोणताही खेळ खेळताना आपल्या शरिराची लवचिकता असणं तितकंच महत्वाचं आहे.

परंतू काय तुम्ही एका गाईला फुटबॉल खेळताना पाहिलं आहे का?, तर याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक गाई फुटबॉल खेळत असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका मैदानावर काही मुलं फुटबॉल खेळत असताना अचानक त्या ठिकाणी एक गाई आली आणि तिने त्या मुलांचा बॉल त्या गाईजवळ गेला, त्यानंतर ती गाई त्या ठिकाणावरून दुसरीकडे जाईल असं त्या मुलांना वाटतं होतं. मात्र ती गाई जागची हल्ली नसून, तिने आपल्याकडेचं ठेवला असल्याचं दिसून येतं आहे.

ती गाई तो बॉल आपल्या पायाने पुढे मागे करत आहे. तिच्याकडं पाहून असं वाटतं आहे की, तिला खरच फुटबॉल कसा खेळतात हे माहित असावं. काही वेळानंतर एक मुलगा धाडस करून त्या गाईसमोर जातो आणि आपला बॉल हातात घेण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून ती गाई त्याच्यावर धाऊन जाते व तो बॉल पायाने आपल्याकडे घेते.

हा व्हिडीओ ‘@kumarayush084’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘गाय ने खेला फुटबॉल दिखाए प्रोफेशनल खिलाड़ी की तरह करतब’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंटही केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘सलमान खान माझे कपडे आणि चप्पल सांभाळायचा’,…

‘देऊळबंद’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी…

सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे कारला लागली आग…

माजंरीच्या पिल्लांना वाचवण्यासाठी चिमुलीची धडपड पाहून…

हौसेनं गेली पोल डान्स करायला अन्…, पाहा व्हायरल…