भन्नाटच! TATAची नवी एसयूवी AVINYA लवकरच बाजारात धडकणार; वाचा फिचर्स

मुंबई | भारतात मोठ्या गाड्यांची क्रेझ असते. मोठ्या गाड्यांना भारतात मोठी मागणी देखील असते. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्या भारतात नवनवीन माॅडल लाँच करत असतात.

अशातच आता Tata Motors ने शुक्रवारी एक नवीन इलेक्ट्रिक संकल्पना SUV Avinya सादर केली आहे. ही पुढच्या पिढीची ईवी कार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने हे मोठं पाऊस कंपनीने उचललं आहे. टाटा मोटर्सने 2025 पर्यंत नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय.

Tata Avinya ही पुढच्या पिढीची संकल्पना कार आहे, या कारला अनेक सर्व वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही कार भविष्यवादी असणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. स्टेरिंगमध्ये देखील डिस्पले असणार आहे. त्याचबरोबर एलईडीचा वापर देखील करण्यात आला आहे.

या कारला बटरफ्लाय दरवाजे असणार आहेत. त्यामुळे कार आणखीनच देखणी दिसणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. फक्त 30 मिनीटाची चार्जिंग केल्यानंतर कार 500 किमी धावू शकणार आहे.

दरम्यान, टाटा मोटर्सने या नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कारचे नाव संस्कृत भाषेतील अविन्या या शब्दावरून घेतले आहे, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ आविष्कार असा होतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राज ठाकरेंनी सभा घेण्यापूर्वी आमच्यासोबत इफ्तार पार्टी करावी”

“राष्ट्रवादीला युतीत शिवसेना नको होती, पण…”; रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

“देवेंद्र फडणवीस वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील”, चंद्रकांत पाटलांचा दावा

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार”