अजित पवार भाजपसोबत का गेले होते?; शरद पवारांचा खुलासा

मुंबई | दिल्लीतील नेहरू सेंटरमधील बैठकीत माझे काँग्रेसपक्षातील काहींशी तीव्र मतभेद झाले होते. जर आताच हे काँग्रेस अशा प्रकारची टोकाची भूमिका घ्यायला लागले तर, उद्या सरकार तरी कसं चालणार? असा आक्षेप घेत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेससोबत झालेल्या वादानंतर मी तेथून निघून गेलो. त्यानंतर अजित पवार यांनी आमच्या सहकाऱ्यांजवळ काँग्रेसबद्दलची नाराजी व्यक्त केली. तेव्हापासून ते अस्वस्थ होते, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेतला, असं ते म्हणाले. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही सर्व कुटुंबीय नाराज झालो होते, असंही त्यांनी सांगितलं आहे. शरद पवार ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच अजित पवार यांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-