Top news देश

आर्थिक तंगीत 9 लाखाच्या हिऱ्यांची बॅग सापडली, कामगारानं जे केलं ते वाचून हैराण व्हाल!

नवी दिल्ली | मार्च महिन्यापासून देशभरात टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर अनेकांचे आर्थिक गणित बिघडले. काही नागरिकांचे हातचे कामही गेले. त्यामुळे पैशांची गरज भासू लागली. सध्या आपण इकडे पैशांची चोरी झाली तिकडे दुकान फोडले, अशा अनेक घटना ऐकतोय.

पण गुजरातमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली आहे, ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. राजेश राठोड नावाच्या एका व्यक्तीला वाटेत चालताना रस्त्याच्या बाजूला एक पॅकेट सापडले. त्या पॅकेटमध्ये थोडे नाही तर तब्बल ९ लाखांचे हिरे होते.

राजेश यांना एवढ्या पैशाने सहज जीवन जगता आले असते. पण त्यांनी तसे केले नाही. राजेश एक कारागीर आहे, ते महिन्याला ६००० रुपयांपेक्षाही कमी पैसे कमावतात. राजेश यांच्या इमानदारीपुढे त्यांचा पैशांचा मोह तोंडावर पडला.

राजेश यांनी मूळ मालकापर्यंत चार दिवसातच ते पॅकेट पोहोचवले. एवढ्या दिवस घरी राहिल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी राजेश कामानिमित्त घराबाहेर पडले. राजेश वराछातील हिरा बाजारापर्यंत चालत निघाले होते. सुमुल डेअरीजवळ त्यांना काहीतरी चमकताना दिसले. त्यात हिरे होते.

प्रथम राजेश यांना ३० कॅरेटचा चकाकणाऱ्या हिऱ्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कायमची दूर होईल, असं वाटलं. तेव्हा राजेश म्हणाले,”मी केवळ त्या पॅकेटवर लिहिलेल्या हिऱ्याचे वजन आणि ती संख्या पाहत होतो. मी लगेच माझ्या मित्राला फोन केला, ज्याने मला ते सुरक्षित ठेवायला सांगितले.”

पुढे बोलताना म्हणाले,”पहिल्या दिवशी मी हे ठेवण्याचा निर्णय घेतला. पण ती रात्र उलटल्यानंतर मी ते मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.” त्यानंतर राजेश यांना २८ सप्टेंबरला फोन आला की, हे पॅकेट माझे आहे.

मग राजेश यांनी पूर्णपणे पडताळणी करून तेथील एक हिऱ्याचे दलालचे मालक हरिश विरदिया यांना भेटलो. त्यांना हे पॅकेट सोपवले. हरिश विरदिया म्हणाले की, चालताना ते खिशातील रुमलातून बाहेर पडले. त्यातच त्यांनी ते हरवले. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती.

हिऱ्याचे मालक म्हणाले,”मी राठोड यांच्या इमानदारीवर खूपच आनंदी झालो आहे. जर राठोड यांनी हे पॅकेट मला दिले नसते तर मला माझ्या मालकाला ९ लाख द्यावे लागले असते.” असे इमानदार व्यक्ती पाहिले की, माणुसकीवरील विश्वास अजून दृढ होतो.

महत्त्वाच्या बातम्या-

मुकेश खन्ना यांनी अखेर ‘ते’ मोठं रहस्य उलगडलं; कपिल शर्माच्या शोमध्ये…

साऊथचे 7 जबरदस्त हिट हिंदी सिनेमे; हे पाहिले नाहीत तर काय पाहिलं?

रियानं सुशांतला आ त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं होतं? सीबीआयचा मोठा खुलासा

मराठी रंगभूमीवर पुन्हा शोककळा! ‘हा’ बडा अभिनेता काळाच्या पडद्याआड

कोरोनामुळे नपुंसकत्व येवू शकतं; संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष