पुणे | पुण्यातील बालेवाडी परिसरातून काही दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेला मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गू चव्हाणचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
स्वर्णवचं अपहरण बालेवाडी भागातून करण्यात आलं होतं. पण तो पुनावळे येथील भागात आज आढळून आला होता. त्याला अपहरण करणाऱ्यांनी अपहरणाची योजना अपयशी ठरत असल्याचं लक्षात येताच त्याला तिथं सोडून पळ काढला आहे.
स्वर्णव हा 4 वर्षाचा मुलगा त्याचे आई-वडिल डाॅक्टर आहेत. स्वर्णवचं अपहरण झाल्यानंतर त्याच्या वडिलांना सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केलं होतं.
स्वर्णवचं अपहरण हे दहा दिवसांपूर्वी झालं होतं. तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पुणे पोलिसांनी तपास चालू केला होता. पोलिसांनी पुणे शहरासह जिल्हाभरातील स्थानकामध्ये स्वर्णवची माहिती देण्यात आली होती.
स्वर्णवचे वडिल सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावरून वारंवार अपहरणकर्त्यांना आवाहन केलं होतं. हवे तितके पैसे घ्या पण माझ्या मुलाला सोडा, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं होतं.
माझ्या मुलाला काही आजार झाला तर त्याला गोळ्या द्या. अपहरणकर्त्यांना त्याची काळजी घेण्याची विनंती चव्हाण यांनी केली होती. शहरातील मेडिकल चालकांना बालकांची औषधे नेण्यासाठी येणाऱ्यांवर नजर ठेवण्याच आवाहन देखील त्यांनी केलं होतं.
सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावरून वारंवार आपल्या लहान मुलासाठी भावनिक आवाहन केलं होतं. भाजप आमदार महेश लांडगे यांनी स्वर्णवच्या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातल्याचं पहायला मिळालं होतं.
मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आणि नेटीझन्सनी स्वर्णवला शोधण्याची मोहिम राबवली होती. परिणामी अखेर स्वर्णव सापडल्यानं प्रत्येकाला आनंद झाला आहे.
दरम्यान, शहरामध्ये अशा घटना परत घडू नयेत म्हणून स्वर्णव सापडला असला तरी त्याचं अपहरण करणाऱ्यांचा शोध चालू आहे. पुणे पोलिसांनी पथके सध्या त्यांच्या मागावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी
नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…
ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!
रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता
वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन