Top news मनोरंजन

‘ब्रा’ आणि ‘देव’ यावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेत्रीनं मागितली माफी, म्हणाली…

Shweta Tiwari

मुंबई | छोट्या पडद्यावरील हाॅट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता तिवारी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते.

श्वेता तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. आपल्या अभिनयानं, सौदर्यानं, स्टाईलनं ती चाहत्यांची मनं जिंकत असते. नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आता चांगलीच वादात सापडली आहे.

“माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असं तिनं म्हटलं होतं. यावरुन वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. अनेकांनी यावरुन तिच्यावर टीकास्त्र सोडलं.

भोपाळच्या श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये श्वेता तिवारीविरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभिनेत्रीवर आहे.

वातावरण चांगलंच पेटल्यावर आता श्वेता तिवारीनं माफी मागितली आहे. एक निवेदन जारी करत श्वेता तिवारीनं जाहीर माफी मागितली आहे.

“कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असं तिनं यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता तिच्यावर हल्लाबोल करणं कमी झाल्याचं पहायला मिळत आहे.

श्वेता तिच्या आगामी वेबसिरिजच्या घोषणेसाठी भोपाळमध्ये गेली होती. यावेळी बोलताना श्वेताची जीभ घसरली आणि ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’, असं वादग्रस्त वक्तव्य श्वेता तिवारीनं केलं आहे. त्यामुळे सध्या ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. अनेकांनी तिच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर