Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘अल्लाह’साठी चित्रपट सृष्टी सोडणाऱ्या सनाने ‘या’ मौलवींशी निकाह केला, व्हिडिओ व्हायरल

मुंबई | धर्माचं कारण देत सिनेसृष्टीला अलविदा करनारी अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सनाने मुफ्ती अनसशी लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचा व्हिडिओ तीने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. सनाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये सना खान तिचा पती मुफ्ती अनससोबत पायऱ्या उतरून खाली येताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीला केक भरवताना दिसत आहे. लग्नावेळी सनाने पांढर्‍या रंगाचा भरतकाम केलेला ड्रेस घातला होता. तर मुफ्ती अनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता.

सनानं आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिनं ‘जय हो’ या चित्रपटात सलमानची सह अभिनेत्री म्हणून देखील काम केलं आहे. या चित्रपटातील सनाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ‘जय हो’ चित्रपटापूर्वी सना ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वात देखील दिसली होती.

मात्र, आता सनानं चित्रपट सृष्टीला अलविदा केल्यानं तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सनानं सोशल मीडियावरून यासंबंधित माहिती दिली होती. यासंबंधित तिनं ट्वीटरवर लांबलचक पोस्ट लिहित काही गोष्टी शेअर केल्या होत्या.

सर्व भाऊ आणि बहिणींना मी विनंती करते की, इथून पुढे मला चित्रपट सृष्टीतील कोणत्याही कामासाठी बोलावू नये. आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम आणि सहकार्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे, असं सनानं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

हे आयुष्य प्रत्यक्षात मृ.त्युनंतरचे जिवन सुधारण्यासाठी आहे. माणूस जेव्हा विधाताच्या आज्ञेनुसार जगेल तेव्हाच त्याचे जिवन सार्थकी लागेल. जिवनात केवळ संपती कमवणे याला जिवनाचं उद्दिष्ट माणू नका. आपले ध्येय सिद्ध करा. मानवतेचं रक्षण करा, असंही सनानं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

तसेच आज मी इथे जाहीर करते की, आजपासून मी चित्रपट सृष्टी सोडत आहे. आजपासून मी माझ्या विधात्याच्या आज्ञेचं पालन करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे मी चित्रपट सृष्टीला आता अलविदा करत आहे, असंही सनानं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, सना खान एक उत्तम डान्सर देखील आहे. तसेच सना अभिनयासोबतच मॉडेलिंग देखील करत होती. तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपट सृष्टीत खूप लवकर यश मिळवलं होतं.

सनानं 50 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. जय हो चित्रपटानंतर सना चित्रपट सृष्टीत दिसली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिनं चित्रपट सृष्टी सोडत धर्माच्या मार्गावर चालणार असल्याचं जाहीर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानं संतापलेला सुर्यकुमार रोहितसमोर मन मोकळे करत म्हणाला…

सुशांतच्या 17 कोटींचा घोटाळा आणि दिनेश विजयन यांचा संबंध काय? वाचा सविस्तर

अंकिता पुन्हा सुशांतच्या आठवणींना उजाळा देत टेलिव्हिजनवर सुशांतसाठी करणार ‘ही’ गोष्ट

एकीकडे पत्नी प्रेग्नंट तर दुसरीकडे सैफ अलीच्या मुलासाठी येत आहेत लग्नाचे प्रस्ताव

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यामुळे आरोह वेलणकर आणि महेश टिळेकर भिडले, एकमेकांवर टीका करत म्हणाले…