Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘या’ बड्या अभिनेत्रीवर आधी चाकूने ह.ल्ला आता जीवे मा.रण्याची धमकी, अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी साद

मुंबई| चित्रपट सृष्टीतील अनेक प्रेम प्रकरणे आत्तापर्यंत समोर आली आहेत. यातील काही प्रेमकहाण्या यशस्वी झाल्या तर काही कहाण्या अपुऱ्याच राहिल्या. अशातच आता बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आलं आहे. लग्न करण्यास नकार दिल्याने अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर तिच्या मित्रानेच चाकूने ह.ल्ला केला आहे.

या ह.ल्ल्यात मालवीला खूप दुखापत झाली आहे. या ह.ल्ल्यानंतर मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. ह.ल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यानं तिने प्लॅस्टीक सर्जरी देखील केली आहे.

या प्रकरणातून बाहेर पडत असतानाच मालविला जिवे मा.रण्याचं ध.मक्या येत असल्याचं आता समोर आलं आहे. मालवीने स्वतःचा जिव वाचवण्यासाठी मुंबई पोलीसांन मदत मागितली आहे. मालवीने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. तसेच तिने मुंबई पोलिसांकडे एक अर्ज देखील दिला आहे. यासंबंधित तिने ट्वीट करत माहिती दिली आहे.

तिने ट्विट करत म्हटले आहे की, योगेश महिपालने माझ्यावर ह.ल्ला केल्यानंतर आता मला जीवे मा.रण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्ती यासंदर्भात मला ध.मकी देत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

तसेच या ह.ल्ल्यामुळे मला भीती वाटू लागली आहे. मला योगेशचा चेहरा आठवला तरी मी खुप हैरान होते. त्याच्या त्या कृत्तीची मला खूप आठवण येते. त्यामुळे मला खूप भिती वाटते. योगेशने माझ्यावर केलेल्या ह.ल्ल्यामुळे मला मानसिक आणि शारीरिकरित्या खूप त्रास सहन करावा लागला आहे, असंही मालवीने म्हटलं आहे.

मालवीने या ट्वीटमध्ये पुढे मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. मुंबई पोलिसांनी वेळीच योगेशला अ,टक केल्यानं माझा जीव वाचू शकला आहे. यासाठी मी मुंबई पोलिसांचे आभार मानते, असं मालवीने म्हटलं आहे.

दरम्यान, मालवी २९ वर्षाची आहे. ती हिंदी चित्रपटात आणि मालिकेत अभिनय करते. योगेशला मालवी आवडू लागल्यानं त्यानं फेसबुकद्वारे तिच्याशी संपर्क साधला. यानंतर त्याने तिला आपण दिग्दर्शक असल्याचं सांगितलं.

पुढे चित्रपटाचे बहाणे बनवून तो तिला भेटू लागला आणि याच भेटीदरम्यान त्याचं तिच्यावर प्रेम असल्याचं तो बोलू लागला. मालवीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्यानं त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! कॉमेडीयन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष ‘या’ प्रकरणी गजाआड

काय सांगता! जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोना झाला नाही?

धक्कादायक! ‘त्या’ मृ.त्यू प्रकरणात राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे नेते सामील आहेत?

‘त्या’ बड्या अभिनेत्याची ह.त्याच झाली होती?; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग

सर्वांच्या लाडक्या प्रभू देवाचं अखेर ठरलं! वाचा कोणाबरोबर घेतोय प्रभू सात फेरे?