पतीपेक्षा वयाने मोठी असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने पतीला सांगितलं, मला दुसरा पुरुष आवडतो अन् मग…

मुंबई | पडद्यावरील प्रत्येकंच कलाकाराची पडद्यामागे देखील एक वेगळी कहाणी असते आणि आपल्या आवडत्या कलाकारांची हीच पडद्यामागची कहाणी जाणून घेण्याची चाहत्यांना आवड असते. प्रत्येकंच कलाकार पडद्यामागील जिवनात कडू गोड गोष्टींचा सामना करत असतो. बरेच कलाकार या गोष्टी आपल्या चाहत्यांबर देखील शेअर करत असतात.

अभिनेत्री काश्मिरा शहा देखील असंच पडद्यामागील जिवनात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या चाहत्यांबर शेअर करत असते. काश्मीरचा पती कॉमेडियन कृष्णा अभिषेक तिच्यापेक्षा वयाने लहान आहे. काश्मिरा शहा आणि कृष्णा अभिषेक या जोडप्याने देखील आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे. हे जोडपं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी दिलखुलासपणे चाहत्यांशी शेअर करताना दिसतं.

कृष्णाशी लग्न होण्यापूर्वी काश्मिराचं लग्न चित्रपट निर्माता ब्रॅड लिस्टरमॅन यांच्याबरोबर झालं होतं. मात्र, लग्नानंतर अवघ्या 6 वर्षांनी या दोघांचं नातं संपुष्टात आलं. या दोघांनाही समजून चुकलं की इथून पूढे एकमेकांसोबत राहणं कठीण आहे. यामुळे त्या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिलं.

काश्मिराने त्यावेळी आपल्या पतीला हे देखील सांगितलं होतं की तिला कृष्णा आवडतो. काश्मिराचा पती देखील त्यावर काहीच रिऍक्ट झाला नव्हता. याविषयी स्वतः काश्मिराने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

यावेळी मुलाखतीत बोलताना काश्मिरा म्हणाली होती की, माझ्यापेक्षा माझ्या पतीला काम अधिक महत्वाचं झालं होतं. त्याच्या या कामानेच आम्हा दोघांला एकमेकांपासून वेगळं करण्यात महत्वाची भूमिका बजावली. लग्नाच्या काही वर्षानंतर आमच्या नात्यात उतार चढाव सुरू झाले होते.

आम्हा दोघांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले. जेव्हा मी आमच्या नात्यात उतार चढाव पाहत होते त्यावेळी मी माझ्या पतीला म्हणजेच ब्रॉडला हे देखील सांगितलं होतं की, मला कृष्णाबद्दल त्याच भावना वाटतात ज्या त्याच्याबद्दल होत्या, असंही काश्मिराने म्हटलं आहे.

दरम्यान, कृष्णा आणि काश्मिरा दोघेही आज वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहेत. मात्र, ज्यावेळी या दोघांनी लग्न केलं त्यावेळी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकजण बोलत होता की काश्मिराचा तापट स्वभाव कृष्णा झेलू शकणार नाही.

एवढंच नव्हे तर कृष्णाच्या घरच्यांनी देखील या लग्नाला विरोध केला होता. यामुळे कृष्णा आणि काश्मिराने गुपचूप लग्न केलं होतं. आज हे दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

क्या बात है! आता तुरुंगात सुरू होतंय रेडिओ स्टेशन, गुन्हेगार होणार रेडिओ जॉकी

सलग 17 व्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; वाचा आजचा दर

गाडीसमोरुन अचानक सिंह शिकार करण्यासाठी धावून आला अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

मिका सिंगने नॅशनल टीव्हीवर ‘या’ सिंगरला लग्नासाठी घातली मागणी; व्हिडीओ व्हायरल

महिलेवर बलात्कार करून पळत होता आरोपी, कुत्र्याने केलं असं काही की आरोपी गेला गजाआड