मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यू प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या तीन उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत होत्या. तरीही सुशांत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला होता.
मात्र, आता अखेर सुशांत प्रकरणातील गुंता सुटताना दिसत आहे. सुशांतच्या मृ.त्युप्रकरणी शोध घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीमसुद्धा सीबीआयला मदत करत होती .एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं अखेर सुशांत प्रकरणाचे मेडिकल अहवाल सीबीआयकडे सोपविले आहेत.
सुशांतच्या सर्व फो.रेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे. मात्र, एम्सनं दिलेल्या रिपोर्टवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते.
सुशांतची आ त्मह.त्याच आहे हे कशावरून?, असा सवाल एम्सच्या डॉक्टरांना विचारण्यात आला होता. तसेच सुशांतची आ त्मह.त्याच आहे हे सिद्ध करून दाखवा, असं म्हणत सुशांतच्या वडिलांनीही एम्सच्या टीमला काही प्रश्न विचारले होते. यावर एम्सच्या डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सुशांतच्या शरीरावर ज.खम झाल्याचे कोणतेही निशाण नव्हते. त्यामुळे मृ.त्युपूर्वी सुशांतची झटापट झाली असावी, अशी कोणतीही चिन्हे मिळाली नाहीत. सुशांतच्या मानेवर जे निशाण आढळले ते त्या कापडाचे आहेत ज्याला लटकून सुशांतनं आ त्मह.त्या केली होती, असं एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
तसेच सुशांतनं ज्या कापडाच्या सहायाने आ त्मह.त्या केली त्या कापडाचीही टेस्ट करण्यात आली. ते कापड 200 किलोपर्यंत वजन झेलू शकतं. सुशांतचं वजन 200 किलोपेक्षा नक्कीच कमी होतं, असंही एम्सच्या टीमनं स्पष्टीकरण दिलं आहे.
सुशांतची ह.त्या टेझर ग.ण वापरून करण्यात आली होती, असं म्हणलं जात होतं. यावरही एम्सच्या टीमनं स्पष्टीकरण दिलं आहे. टेझर ग.णमुळे एक जळाल्यासारखी जखम होते. मात्र, आम्हाला सुशांतच्या शरीरावर अशी कोणतीच जखम मिळाली नाही, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची कथित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेतलं होतं. मात्र, 29 दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयानं आज रियाचा जा.मीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार
नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…
सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय
बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन
नोरा फतेहीचा ‘प्यार दो, प्यार लो’ गाण्यावर जलवा, असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल!