मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. बऱ्याच दिवसांपासून राजकारणात एक नाव कायम आपल्या समोर येत आहे, ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते.
त्यातच आता काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार आहे, असा बातम्या येत आहे. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.
एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे ऐकून एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे कोणत्या पक्षात जाणार आहे, याबाबत त्यात कोणताही उल्लेख आढळत नाही. पण यामधून कोणत्या तरी पदाबाबत बोलणी सुरू असल्याच समजतंय. कार्यकर्ता म्हणतो,”भाऊ, आपला काहीतरी निर्णय घ्या. आताही त्यांनी तुम्हाला काहीही दिलं नाही. पंकजा मुंडेंना दिलं..”
यावर एकनाथ खडसे म्हणतात,”उद्या जायचं ठरलंय.” त्यानंतर कार्यकर्ता म्हणतो,”जायचं का भाऊ ? नक्की आहे का? निश्चित जायचं ना?” मग एकनाथ खडसे म्हणतात की, “हो, पण मग गेल्यावर काय करायचं ते सांगतो.”
मग कार्यकर्ता म्हणतो,”भाऊ आतापण त्यांनी तुम्हाला डावललं, आम्ही खूप नाराज आहोत.” यावर एकनाथ खडसे म्हणतात, “अरे जाणार आहे, पण शेवटी पद-बिद काहीतरी ठरलं पाहिजे ना.” कार्यकर्ता म्हणतो, “ते पण आहे भाऊ.”
यावर एकनाथ खडसे म्हणतात, “नुसतं जाऊन लाचारासारखं बसून राहायचं, पद-बिद काही नाही, नुसतं इकडनं तिकडं. योग्य वेळी जाऊ, या महिन्याभरात जाणार आहे पण पद-बिद ठरल्याशिवाय काही जात नाही.” हा आवाज माझा नाही, माझ्यासारखा आवाज काढणारे महाराष्ट्रात भरपूर आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला.
बऱ्याच दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की, या बैठकीत खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“माल म्हणजे काय?”, दीपिकाच्या उत्तराने हैराण झाले एनसीबीचे अधिकारी
राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी…
गाडीवाल्यांनो चुकूनही करु नका ‘ही’ गोष्टी, नाहीतर भरावा लागेल 5 हजार रुपये दंड!
‘ही’ निर्माती का ढसाढसा रडू लागली आहे? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल
ड्र.ग्ज प्रकरणी अडकलेल्या साराच्या मदतीसाठी वडील सैफ अली खान यांनी उचललं ‘हे’ पाऊल