Top news खेळ देश

यशस्वी जयस्वालच्या बॅटला बॉल लागला आणि परत आलाच नाही, कारण…

नवी दिल्ली | २०२० च्या आयपीएल मोसमातील २३ वा सामना शुक्रवारी पार पडला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. शुक्रवारचा हा सामना राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात पार पडला.

राजस्थान रॉयल हा सामना ४६ धावांनी हरली. पण राजस्थान रॉयलच्या एका फलंदाजाने असा षटकार मारला की, हे पाहून सर्व चकितच झाले. यशस्वी जयस्वाल यांनी क्रीडा रसिकांना चकित करणारा षटकार मारला.

११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वाल यांनी हा षटकार मारला होता. दिल्ली कॅपिटलचे गोलंदाज मार्कस स्टोइनिस यांच्या षटकाला असा जोरदार षटकार मारला की, तो स्टेडियमच्या छप्पर असते, त्याच्याही वर गेला.

खुद्द मार्कस स्टोइनिस हे यशस्वी जयस्वाल यांनी मारलेला षटकार पाहून चकित झाले. पण या सामन्यात यशस्वी जयस्वाल काही चांगली कामगिरी करू शकले नाही. त्यांनी ३४ धावा केल्या.

१३ षटकात मार्कस स्टोइनिस यांच्याच चेंडूवर ते बोल्ड आऊट झाले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांनी २० षटकांमध्ये आठ विकेट गमावून हे लक्ष्य पार केले होते.

राजस्थान रॉयल एवढ्या धावांचे लक्ष्य पार करत असताना १९.४ षटकांमध्येच त्यांचा संघ ऑलआऊट झाला. राजस्थान रॉयलच्या राहुल तेवतिया या खेळाडूने सर्वात जास्त ३८ धावा केल्या.

राजस्थान रॉयल संघासाठी हा सलग चौथा पराभव आहे. आयपीएलच्या मोसमातील सुरवातीचे दोन सामने राजस्थान रॉयलने जिंकले होते. त्यानंतर संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळालेला नाही. राजस्थान रॉयलचे गोलंदाजही मैदानात काही खास खेळ दाखवू शकले नाही.

यशस्वी जयस्वाल यांनी ३४ धावा, जोस बटलर यांनी १३ धावा, कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी २४ धावा, संजू सॅमसन यांनी ५ धावा केल्या, हे दिग्गज खेळाडूही धावपट्टीवर टिकू शकले नाही. अखेर राहुल तेवतिया हे ३८ धावा करून बाद झाले आणि त्यानंतर संघाचे जिंकणे अजूनच अवघड झाले.

यशस्वी जयस्वाल या मुंबईच्या एका युवा फलंदाजाने इतिहासही रचला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्ध १५४ चेंडूत २०३ धावा केल्या होत्या. एवढ्या कमी वयात क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारा खेळाडू ठरला आहे. एखादा सामना पलटवण्याची ताकद या खेळाडूत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमुळे नवऱ्याचा चांगला जॉब गेला; हार न मानता पत्नीनं निवडलं ‘हे’ काम!

सुशांत प्रकरणी बोलताना आता उर्वशीनंही सांगितलं पडद्यामागचं सत्य म्हणाली…

रेखा सध्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते? वाचा काय म्हणाली होती रेखा

चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश