आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण हेअर कट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ प्रचंड व्हायरलही होतात.
तर असाच एक हेअर कट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ संपूर्ण पाहून तुम्हाला ध.क्का बसल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हि़डीओमध्ये एक व्यक्ती सलूनमध्ये आपले केस कापत आहे. सलूनवाला त्याचा हेअर कट करत असल्याचं आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
सलूनवाला त्या व्यक्तिचे केस कापता-कापता स्वत:चेही कापत आहे. हे पाहून त्या कस्टमरला वाईट वाटतं आहे. तसेच त्या कस्टमरच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील असून, सलून वाल्याचं नाव बार्बर जोएल ओर्टेगा आहे आणि कस्टमरचे नेफताली मार्टिन असं आहे. हे दोघेही एकमेकांचे मित्र असल्याचं समजतं आहे.
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की नेफताली मार्टिनला अचानक रडू कसं कोसळलं. नेफतालीला कॅन्सर हा आजार आहे. कॅन्सर झाल्यावर त्यामध्ये त्या व्यक्तिचे केस जायला सुरूवात होते. त्याला आधार देण्यासाठी जोएल आपलेही केसं कापतो.
हा व्हिडीओ बार्बर जोएल ओर्टेगा याने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. त्याचे neftabarber हे यूजरनेम आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर भाऊक कमेंट केल्या आहेत. जोएलने हा व्हिडीओ पोस्ट करताना स्पॅनिश भाषेत एक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यात त्यानी म्हटलं की, तू एकटा नाहीस.
तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 28 हजार लोकांनी लाईक केलं आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
एक बिस्कीट ‘या’ अभिनेत्रीच्या जिवावर बेतलं, ना…
बर्फावर रॅम्प वॉक करायला गेला अन् चांगलाच आदळला, वाघाची…
भर चौकात पोलिसांनी जोडप्यावर गोळीबार केला! पाहा नेमकं काय…