मन मोठं असावं लागतं… भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

नवी दिल्ली |  लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. अन्नधान्यावाचून हाल झालेल्या 100 कुटुंबांना चक्क भिकाऱ्यानं महिन्याभराचं धान्य पुरवलं आहे.

भीक मागून जगणार्‍या दिव्यांग राजूने एक अनोखं उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. राजूने आतापर्यंत 100 गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन आणि 3000 मास्क दिले आहेत.

दिवसभरात भीक मागून जे काही पैसे मिळतात तो त्याच्या गरजेपुरता खर्च करतो, उरलेला पैसा जमा करून ठेवतो आणि गरजू लोकांमध्ये त्याचं वाटप करतो, असं राजूने सांगितलं. राजू गरीब मुलांच्या शाळेची फीसुद्धा भरतो आणि आतापर्यंत त्यानं 22 गरीब मुलीचं लग्न लावून दिलं आहे.

राजू सायकलमधून फिरतो आणि दिवसभर भीक मागतो. भीक मागून जमवलेल्या त्याच पैशातून तो लोकांना मदत करतो. राजूने आपल्या भीक मागून जमवलेल्या पैशांतून अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“राहुल गांधींनी मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्याने निर्मलाताईंना दुख: झालं हे अक्रितच”

-प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं म्हणजे नवरीशिवाय लग्न करणं- शोएब अख्तर

-रोज पत्रकार परिषदा घेताय पण लोकांच्या मुखापर्यंत पॅकेज पोहचेल तो दिवस खरा- संजय राऊत

-मुंबई-पुण्यामधून गावी जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती, म्हणाले…

-‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!