मोदी सरकारचा मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनी देखील विकणार

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकार एअर इंडियानंतर आणखी एक कंपनी विकण्याच्या तयारीत आहे. सरकारची मालकी असलेल्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या विक्रीसाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या कंपनीच्या विक्रीसाठी सरकारला खरेदीदार देखील सापडल्याची माहिती समोर आली आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या निर्गुंतवणूकीच्या आरखड्यानुसार लिलावासाठी उत्सुक कंपनी सापडली आहे, असं त्यांनी म्हटलंय.

सरकारने जारी केलेल्या अटींनुसार सीईएल खरेदी करणाऱ्या कंपनीची मार्च 2019 पर्यंत किमान 50 कोटी रुपयांची संपत्ती असली पाहिजे. ते सीईएलमध्ये खरेदी केलेले भाग पुढील तीन वर्षांसाठी इतर कोणालाही विकू शकत नाही.

CEL ही केंद्र सरकारची इंजिनिअरिंग कंपनी आहे. कंपनीचा कारखाना गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद येथे आहे. कंपनीत सोलर फोटोवोल्टेइक्स, फिटर्स आणि piezo ceramics तयार केले जातात.

1977 साली भारतात पहिल्यांदाच सोलर सेल आणि 1978 साली सोलर पॅनलची निर्मिती केली होती. याच कंपनीनं 1992 साली भारतात पहिल्यांदाच सोलर प्लांटची स्थापना केली होती. 

महत्वाच्या बातम्या-

मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण…- शरद पवार

‘अजूनी यौवनात मी…’; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

…ते महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिताही बनवतील- असदुद्दीन ओवैसी

केंद्राची ऑफर नाकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत- चंद्रकांत पाटील

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा काय आहे सोन्याचा दर