शिवसेनेचा लखलखता तारा निखळला! ‘या’ बड्या नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं नि.धन

कल्याण | शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचं आज हृदयवि.काराच्या झट.क्यानं निध.न झालं आहे. शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या अशा अकाली मृ.त्यूनं शिवसेनेवर शो.ककळा पसरली आहे. राजेंद्र देवळेकर यांची सर्वसामान्य लोकांसाठी पूर्ण मेहनतीनं आणि लोकांच्यात जाऊन काम करणारा नेता, अशी ओळख होती.

काही दिवसांपूर्वी राजेंद्र देवळेकर यांच्यात कोरोनाची लक्षण दिसू लागल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. देवळेकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात  त्यांच्यावर उपचार चालू होते. कोरोनाशी झुं.ज देत देवळेकर यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

कोरोनावर मा.त केल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी त्यांना अचानक हृदयवि.काराचा झ.टका आला. यानंतर देवळेकर यांना रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृ.त घोषित केलं. कोरोनावर मात करूनही राजेंद्र देवळेकर अचानक कुटुंबाला सोडून गेल्यानं देवळेकर कुटुंबियांवर  शो.ककळा पसरली आहे.

कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून राजेंद्र देवळेकर यांची ओळख होती. 2015 साली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं होतं. यावेळी राजेंद्र देवळेकर यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. महापौरपदी असताना देवळेकर यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी स्वतःला सर्वस्वी झोकून दिलं होतं.

महापौरपदी असतानाच्या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी महापालिकेची रखडलेली अनेक कामे मार्गी लावली होती. पालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. सलग चार वेळा राजेंद्र देवळेकर मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले होते. राजेंद्र देवळेकर यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींनी शो.क व्यक्त केला आहे.

दरम्यान, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी राजेंद्र देवळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. मात्र आज अखेर राजेंद्र देवळेकर मृ.त्यूशी झुं.ज देण्यात अपयशी ठरले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘अनुराग कश्यपनं मलाही घरी बोलावलं अन् मला म्हणाला…’; आणखी एका बड्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

दीपिका पदुकोनला अ.टक होऊ शकते का?, उज्जल निकम म्हणतात…

आपल्या साडीचा पदर खाली पाडून तिने अनुरागकडे…’; दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

2 चेंडू, 4 षटकार आणि 27 धावा; जोफ्रा आर्चरनं शेवटच्या षटकात काय करामत केली?

ड्र.ग्ज कनेक्शन : दीपिका पादुकोणनंतर आता या बड्या अभिनेत्रीचं नाव समोर, चौकशी होणार!