मुंबई | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. त्यावेळी भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
कसोटी विश्वचषकात विराटसेनेेने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाची शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेटी विश्वचषकानंतर रवी शास्त्री निवृत्त होणार आहेत.
रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी त्यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज देखील मागवले होते.
रवी शास्त्रीनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी जिग्गज खेळाडू ‘द वाॅल’ म्हणजेच राहुल द्रविडची निवड केली जाईल असे संकेत बीसीसीआयने दिले होते.
त्यानंतर आता राहुल द्रविडची भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. ट्विट करत बीसीसीआयने ही माहिती दिली आहे.
जुलैमध्ये भारताचा एक संघ इंग्लंडविरूद्ध कसोटी सामना खेळत होता. त्याचवेळी भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 जुलैपासून टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. त्यावेळी राहुल द्रविड भारतीय ब संघाचा मुख्य प्रशिक्षक होता.
भारतीय ब संघाच्या दौऱ्यानंतर राहुल द्रविड भारताचा आगामी कोच असू शकेल, अशी चर्चा क्रिडाविश्वात रंगली होती. त्यानंतर आता बीसीसीआयने या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
राहुल द्रविड यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीमध्ये भारत A आणि अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती.
दरम्यान, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली शुभमन गिल, पृथ्वी शाॅ, कमलेश नागरकोट्टी यांसारखे खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान मिळू शकतं.
दरम्यान, सध्याचा भारताचा टी ट्वेंटी कर्णधार विराट कोहली देखील कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला टी ट्वेंटीचा नवा कर्णधार देखील लवकरच मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त
”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा
“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”
“अजित पवार फसवाफसवी आणि बनवाबनवी करणं थांबवा”
सोनं खदेरी करणाऱ्यांसाठी सुर्वणसंधी, सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट