Top news खेळ देश

सनरायझर्स हैदराबादला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका; ‘हा’ स्टार स्पर्धेतून बाहेर!

नवी दिल्ली | आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोरील अडचणी काही होताना दिसत नाही. सनरायजर्स हैदराबाद एक वेळ आयपीएल जिंकलेला संघ आहे. ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू खेळाडू एक सामना खेळल्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडले होते.

पण आता सनरायजर्स हैदराबाद संघाला अजून एक झटका लागलेला आहे. भारताचा दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्यामार्फत संघाला धक्का बसला आहे. आता भुवनेश्वर कुमारही आयपीएल २०२० मधून बाहेर पडला आहे.

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला होता. यामध्ये जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्या हिपला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार यांना आयपीएलमधून बाहेर पडावे लागले.

या झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्जला हरवले होते. पण यामध्ये भुवनेश्वर कुमार यांना शेवटची ओव्हर टाकता आली नाही. भुवनेश्वर कुमार ती ओव्हर टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना जमले नाही. त्यानंतर ते मैदान सोडून निघून गेले.

यामुळे सनरायजर्स हैदराबाद संघासाठी ही खूपच वाईट बातमी आहे. संघाच्या सूत्रांनी वृत्त संस्था एएनआय यांनी सांगितले की, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्यांच्या दुखापतीमुळे २०२० मधील बाकीचे आयपीएल सामने खेळू शकणार नाही.

संघाच्या सूत्रांनी सांगितले,”भुवनेश्वर कुमार या वर्षातील पुढील सामन्यांमध्ये हिस्सा घेऊ शकणार नाही. कारण त्यांना दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. गोलंदाजीचे सर्व नेतृत्व ते करत होते आणि संघाच्या नेतृत्वातील एक  महत्त्वाचा अंग आहे, यामुळे संघाला निश्चिपणे एक मोठा झटका बसला आहे.”

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आमचा सामना झाला. सामना संपल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाले की, भुवनेश्वर कुमार याच्या दुखापतीबाबत मला जास्त काही माहित नव्हतं. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना होण्याच्या आधी डेव्हिड वॉर्नर म्हणाले होते की, भुवनेश्वर कुमार काही सामने खेळण्यास मुकेल.

पुढे बोलताना म्हणाले, त्यांना हिपला झालेल्या दुखापतीमुळे ते आयपीएलमधूनच बाहेर पडले. हा फक्त सनरायजर्स हैदराबाद संघापुरताच नाही तर भारतासाठीही हा मोठा झटका आहे. कारण आयपीएलनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचे आहे. तिथे त्यांना तीन स्वरूपात मालिका खेळायची आहे.

भुवनेश्वर कुमार यांच्या जागी पृथ्वीराज यारा यांना सनरायजर्स हैदराबाद संघात स्थान देण्यात आले आहे. २१ वर्षीय पृथ्वीराज यारा हे डाव्या हाताची जलद गोलंदाज आहे. त्यांना स्थानिक क्रिकेट खेळण्याचा जास्त अनुभव नाही. मागच्या वर्षी आयपीएलमध्ये पृथ्वीराज यारा हे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणात रियाच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायायलानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

सुशांतची ह.त्या की आ.त्मह.त्या; आता सीबीआयनंही केला सर्वात मोठा खुलासा!

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण; आ.त्मह.त्या केली, असा अहवाल देणारा डाॅक्टर आला अडचणीत!

Bigg Boss 14 | लग्न केल्यानंतरही पारस छाबडासोबत रिलेशनमध्ये होती पवित्रा पुनिया?

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!