सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार?

नवी दिल्ली | अर्थमंत्री सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. बजेटचा कालावधी 90 ते 120 मिनिटांपर्यंत असू शकतो. त्यामुळे काही जण सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे सरकार त्यांना दणका देऊ शकते, असंही बोललं जात आहे.

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार स्मार्टफोनसह जवळपास 50 वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकते. अर्थव्यवस्था आणि वित्तीय स्थिती पाहता सरकार हे पाऊल उचलू शकते, असं उद्योग तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

देशांतर्गत उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात परदेशातून आयात होणाऱ्या सुमारे 50 वस्तूंवर आयात शुल्क वाढवू शकते.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल गुड्स, केमिकल आणि हँडक्राफ्ट सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. आयात शुल्क वाढवल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चीन आणि इतर देशांकडून $ 56 अब्ज किमतीच्या उत्पादनांच्या आयातीवर आयात शुल्क लागू केले जाऊ शकते. ज्या वस्तूंवर आयात शुल्क 5 ते 10 टक्क्यांनी वाढवता येईल अशा वस्तूंची ओळख पटवली आहे.

सरकारच्या या पाऊलामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच देशात उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे रोजगाराच्या आघाडीवरही दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, अवघ्या काही तासात देशाचा अर्थसंकल्प सादर होईल. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाच्या कहरामुळे (Corona) सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यात दोन वर्षांत महामगाईने (Inflation) कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत करदात्यांना सरकारकडून मोठी करसवलतीची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य 

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक 

राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता… 

Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार? 

“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ