काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

नवी दिल्ली | काँग्रेस पक्षातून बाहेर पडत कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाची वाट धरली आहे. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने कपिल सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत.

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कपिल सिब्बल यांची जोरदार प्रशंसा केली होती. तेव्हापासून कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्ष राज्यसभेची उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

काँग्रेस पक्षाचे नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिराचे निमंत्रण ही कपिल सिब्बल यांना देण्यात आले होते. मात्र, जी-23 चे बंडखोर कपिल सिब्बल तिथे गेले नाहीत. तेव्हापासून ते पक्ष सोडतील अशी चर्चा होती.

कपिल सिब्बल यांनी औपचारिकरित्या समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाहीये. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

सपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर जात आहेत. फॉर्म भरल्यानंतर सिब्बल म्हणाले की, आम्हाला विरोधी आघाडी करायची आहे.

कपिल सिब्बल यांनी आज लखनौमध्ये राज्यसभेच्या उमेदवाराचा फॉर्म भरल्यानंतर त्यांनी 16 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय 

“मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच…”; ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार