काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राज्यात गुजरातचे तगडे नेते अश्विन कोतवाल भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

खेडब्रह्माचे आमदार अश्विन कोतवाल मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीये.

अश्विन कोतवाल यांची आदिवासी समाजात चांगली पकड आहे, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात.

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने आदिवासी नेते अश्विन काही काळ काँग्रेस पक्षात असंतुष्ट होते.

मी 2007 पासून गुजरातमध्ये काँग्रेस आमदार म्हणून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांची कार्यशैली मी पाहिली आहे. तेव्हापासून माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे, पण विचारधारेमुळे काँग्रेसमध्ये राहिलो, असं त्यांनी सांगितलं.

आता वाटतंय की मला माझ्या भागातील आदिवासींचा विकास करायचा असेल आणि त्यांच्यासाठी काम करायचं असेल तर भाजपच विकास घडवून आणू शकेल, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई! 

“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?” 

“संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही” 

 राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना नवा आदेश, म्हणाले…

 “इथं कोणाची हुकुमशाही चालणार नाही, मग तो कोणीही असो”