पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…

मॉस्को | रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला असून दुसऱ्या महायुद्धातनंतर पहिल्यांदाच जग अशा युद्धाला सामोरं जात आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वाधिक प्रभावशाली असणाऱ्या पुतीन यांचं नाव चर्चेत आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. युद्धाचा पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे.

पुतिन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोत्सोवाचा घटस्फोट झालाय. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा, ही लहान मुलांमधील दुर्मिळ अनुवांशिक रोगांची विशेषज्ञ आहे.

युक्रेनमध्ये युद्ध लादल्याने त्यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा हिचा घटस्फोट झाला आहे, असा दावा रशियन तपास पत्रकार सर्गेई कानेव्ह यांनी केला आहे.

पुतिन यांची मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा आता तिचा डच उद्योगपती पती जोरीट फासेनपासून विभक्त झाली आहे आणि दोघांचा घटस्फोट झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ! 

“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता” 

अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले… 

मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू