मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण प्रियंका गांधींनी 40 टक्के महिलांना तिकिट देण्यासाठी राज्यात सुरु केलेल्या मोहिमेचा चेहरा प्रियंका मौर्य भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील 40 टक्के महिला उमेदवारांना तिकिट देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यात ‘मै लडकी हूं, लड सकती हूं’ अशी मोहीमही सुरु करण्यात आली.
या मोहिमेच्या पोस्टर्सवरील काँग्रेस कार्यकर्ती प्रियंका मौर्य ही असून या चळवळीसोबत ती जोडली गेलेली आहे. मागील काही दिवसांपासून प्रियंका मौर्य चर्चेत आली होती.
प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संसदीप सिंह यांच्यावर तिने तिकिट विकल्याचा आरोप केला होता. प्रियंका मौर्य हिला लखनौमधील सरोजनी नगर येथून तिकिट हवं होतं. मात्र पक्षाने तिला या जागेसाठीचे तिकिट दिले नाही. त्यामुळे ती प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहे.
भाजपच्या कार्यालयात गेलेल्या प्रियंका मौर्य हिने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, मी माझ्या विभानसभा मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती. मात्र पक्षाने तेथून मला तिकिट दिलं नाही.
काँग्रेस महिलांच्या हक्काच्या चर्चा करते, पण इथे आमच्या हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही मोहीमच फसवी आहे, असा आरोप प्रियंका मौर्य हिने केला आहे.
दरम्यान, यूपी निवडणुकीत काँग्रेसच्या ‘मुलगी मी लढू शकते’ या मोहिमेची पोस्टर गर्ल प्रियंका मौर्याने निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
गुरुवारी मौर्य यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. तुम्हाला सांगतो की, काँग्रेसने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने प्रियांका भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असल्याची बातमी होती.
महत्वाच्या बातम्या-
‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या
संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ
“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी”
‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘भूत लागल्या प्रमाणे…’