मुंबई | अखेर नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेचा निकाल पहाटे समोर आला आहे. यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण कोल्हापूरमधून धनंजय महाडिकच हे कोल्हापूरचे पैलवान ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान झालं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपने परस्परांच्या आमदारांच्या मत प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक मतमोजणी लांबली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.
भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे.
दरम्यान, पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले.
भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत धनंजय महाडीक यांनी बाजी मारली.
महत्त्वाच्या बातम्या-
“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”
Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट