उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; ‘शिवसेने’वर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार?

मुंबई | बंडाचं निशाण फडकावणारे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच आमचा गट हीच खरी शिवसेना, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यामुळे शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूये. दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेचं मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. भाजपसोबत जावं हीच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रिपद नाही  दिलं तरी चालेल. पण भाजपसोबत सरकार बनवा, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

आपला वेगळा गट हीच शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे. आज दुपारीच शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी असल्याचं समजतंय.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी हादरली आहे. कालपर्यंत शिवसेनेकडू पक्षाचे बहुतांश आमदार आमच्यासोबतच राहतील, असं सांगितलं जात होतं. मात्र आज सकाळी एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीत पोहोचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सामना’च्या अग्रलेखाची धार वाढली, पाहा नेमकं काय म्हटलंय… 

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा; शिवसेनेचं टेंशन आणखी वाढलं 

‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा’; बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल 

‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच आता…’, संजय राऊतांची खोचक टीका 

’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल