मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कारवाई होत असलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या पेटलेलं पहायला मिळत आहे.
आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयकर विभागाकडून शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आतापर्यंतची आयकर विभागाची ही मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी यशवंत चव्हाण यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला होता. या छाप्यात यशवंत जाधव यांच्या घरी एक डायरी मिळाली होती.
जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि 50 लाख रुपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता, तर त्यानंतर ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी 75 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात यशवंत जाधव यांची डायरी समोर आली असून त्यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली.
दरम्यान, तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. ठाकरे कुटंबाचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो”
कोरोनाच्या XE व्हेरियंटबाबात तज्ज्ञांचा गंभीर इशारा म्हणाले…
Health | उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींचं सेवन टाळा
“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”