मुंबई | मागील काही दिवसांपासून ईडीने (ED) राज्यातील अनेक नेत्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचं पहायला मिळतंय.
अशातच आता ईडीने आता केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त करण्यात आलेली संपत्ती प्रामुख्याने आलिबाग आणि मुंबईतील असल्याची माहिती देखील मिळाली आहे. यामध्ये दादरमध्ये एक फ्लॅट तर अलिबागमध्ये असणाऱ्या 8 जागा आहेत.
ईडीने काही दिवसांपूर्वी प्रविण राऊत यांच्यावर देखील कारवाई केली होती. त्यानंतर आता संजय राऊतांची संपत्ती जप्त केली आहे.
दरम्यान, तब्बल 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर
“शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज