मुंबई | तेल कंपन्यांनी 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली होती, त्यावेळी या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली होती. आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमसाठीचा हा दर आता 2,205 रुपयांवर पोहोचला आहे, याआधी दर 1,955 रुपये होता.
दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. 1 मार्च रोजी याठिकाणी दर 2,012 रुपये होता, 22 मार्च रोजी जेव्हा या दरात घसरण झाली होती त्यावेळी किंमत 2,003 रुपयांवर पोहोचली होती.
कोलकातामध्ये दरवाढीनंतर कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,351 रुपये झाली आहे, जी आधी 2,087 रुपये होती.
चेन्नईमध्ये या 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची किंमत 2,138 रुपयांवरुन 2,406 रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाणं महाग होऊ शकतं.
महत्त्वाच्या बातम्या-
“यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल”
कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय!
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर; ‘या’ तारखेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी
सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ‘या’ गोष्टी महागणार